छत्रपती
छत्रपती
काय वर्णू महाराजांची थोरवी
शब्दांची दालने ही पडावी अपुरी
महाराजांचा थोर असे पराक्रम
नसे याविषयी कोणताही संभ्रम
रयतेचा तो लाडका वाली
त्यांच्या राज्यात सर्वत्र खुशाली
नसे त्यांच्या मनी जातीय दुरावा
शाहीर गाती त्यांच्या कीर्तीचा पोवाडा
शिवरायांनी बांधले
अनेक गडकिल्ले
शत्रूंनाही शौर्य-चातुर्याने
नामोहरण केले
मावळ्यांचा त्यांनी
केला कायम सन्मान
त्यांच्या राज्यात स्त्रियांना
ही मिळालं मानाचा स्थान
दरबारी महाराजांच्या
होते अष्टप्रधान
सामान्य रयतेलाही
मिळे समाधान
महाराजांची थोरवी
गाजे सप्तसमुद्रापार
त्यांनी फडकवला
भगवा अटकेपार
अश्या थोर वीर शिवरायांना
आमचा मनाचा मुजरा त्रिवार
