Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Smita Murali

Inspirational

3  

Smita Murali

Inspirational

छत्रपती राजर्षी शाहू महाराज

छत्रपती राजर्षी शाहू महाराज

1 min
266


२६ जून १८७४ रोजी घाटगे घराण्यात

कागलगावी जन्मला बाळ यशवंत


कोल्हापूर संस्थानाने केले दत्तकविधान

आनंदीमाईने केले शाहू नामकरण 


राज्यसत्ता आली शाहूंच्या हाती

भाग्यमय झाली कोल्हापूरची माती


स्वप्न उरी करावा जनतेचा उद्धार

शोषितांना तारण्या घेतला अवतार


दीन, दलित, अस्पृश्य वा स्त्रियांचा कैवारी

सोयी सुविधा नि कायदेपण केले भारी


प्राथमिक शिक्षण केले सक्तीचे

पहिले पाऊल जन विकासाचे


तळागाळाचा केला सखोल विचार

दूरदृष्टीचा राजा गुणवंतांना देई आधार


कुप्रथांचा कायद्यांनी केला नाश

खुले केले समतेचे सर्वांना आकाश


न्यायाधिकारी भुलोकी जन्मला असा

राज्यकर्त्यांनो घ्या रे, महाराजांचा वसा


शाहूच्या कार्याचा इतिहास तुम्ही अभ्यासा

जनकल्याणाचा चालवा समर्थ वारसा


राजासारखं दिलदार मन,

मनासारखा राजा

तुझ्या दैदीप्यमान कार्याला 

मानाचा मुजरा माझा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational