छोटीसी परी
छोटीसी परी
एकदा एक परी आली माझ्या घरी
घेऊन गेली मला चांदोबाच्या नगरी
नाजूक तिचे पंख सुंदर तिची कांती
फिरवले मला दूर क्षितिजावरती
काय तिचा थाट नि काय तिचा बंगला
देवाजीने बनवून आकाशात टांगला
चॉकलेटची दारे नि खिडक्या गोळ्यांच्या बिस्किटाची गादी नि उशा लिमलेटच्या
परिराणीला खेळायला फुलांचा झुला
राणीच्या स्वागताला चांदण्यांचा मेळा
चांदोबाच्या रथातून आले सारे भेटाया
काहींनी आणले फुलांचे गुच्छ तर काहींनी अत्तराचा फाया
राणी आमची मस्त करे हसून स्वागत
तिच्या घरचा नाश्ता आम्ही केला फस्त
आकाशाच्या अंगणात खूप खूप खेळलो
आणि ददमून भागून झंझालो सगळे सुस्त
