STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

3  

Shila Ambhure

Inspirational

छंद

छंद

1 min
221


कामाच्या रगाड्यातून 

थोडा वेळ राखून ठेवला

फुटबॉल खेळायचा मी

छंद मनापासून जपला.


नोकरी व्यवसाय धंदा

समय सगळा व्यापला

पार पाडुनि कर्तव्ये मी

छंद मनापासून जपला.


धकाधकीच्या जीवनातून

आनंद मी एक शोधला

विसरुनि वेदना सारी मी

छंद मनापासून जपला.


माझा छंद माझा प्राण

दोस्त माझा तोच बनला

एकटा नसतो कधी मी

छंद मनापासून जपला.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational