STORYMIRROR

manisha khamkar

Abstract

3  

manisha khamkar

Abstract

छंद माझा

छंद माझा

1 min
443

हा छंद माझा आगळा

शब्दांचा पसारा सगळा

शब्दांच्या संगतीने कसा

 सरतो दिवस सगळा


शब्दांशी खेळते लपंडाव

शब्दांचीच वल्हवते नाव

शब्दांची सुरू चिवचिव 

अन शब्दांचीच कावकाव


शब्दांच्या बरसून धारा

शब्दांचाच तुफान वारा

शब्दांचा सुगंध सारा

छेडील्या अंतरंगाच्या तारा


शब्दांनी केली जादू

अंतरीच्या भावना मृदू

 एक नवा अर्थ दयावया

बीज काव्याचे रोवायाला


हा छंद माझा वेगळा

कधी जीवास जडला

भावगर्भात पोशिला

अंतरंगात संस्कारीला


 शब्दांचे बीज अंकुरले

शब्दांची उमलली फुले 

गंध फुलांचा त्या दरवळे

काव्यस्वप्न साकारले नवे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract