छान नजर
छान नजर
जशी दृष्टी तशी सृष्टी
आहे अशी म्हण मराठीत
असावी नजर प्रत्येकाची
ती छान, सुंदर बघण्यात.
निसर्गसौंदर्य पाहायचे
तर दृष्टी ही तशीच असावी
तेव्हाच तुमच्या नजरेला
सुंदरता निसर्गाची दिसावी.
दृष्टी आपली एक वरदान
सर्वांना लाभत नसे जीवनात
लाभली तर जतन करा नीट द
निगा ठेऊनी द्यावे नेत्रदानात.
अंधास विचारा मोल दृष्टीचे
तेव्हा कळेल तुम्हाला महत्त्व
दूरदृष्टीने पहा जीवनाकडे
तेव्हाच कळेल दृष्टीचे श्रेष्ठत्व.
