चहा
चहा
वाफळणारा कडक चहा
निर्माण करतो उत्साह,
मरगळणाऱ्या भावनांना
क्षणात करतो निरुत्साह.
गरम गरम चहाचा घोट
मिळताच मन तृप्त होई,
विचारांचा सुळसुळाट
डोक्यातून बाहेर येई.
मसाला चहा ची गोष्ट तर
सगळ्यात एकदम भारी,
चव घेता फुर्रकन त्याची
सगळ्या आजारांना मारी.
आवडतो चहा कोरा काळा
लिंबू पिळून आंबट चटकदार,
चव त्याची खूपच न्यारी
आवडीने प्यावा मजेदार.
