चहा आयुष्याचा ...
चहा आयुष्याचा ...
जीवनाच्या रिकाम्या भांड्यात
घाला स्नेहाचे पाणी,
मायेची चहा पावडर,दयेचे वेलदोडे
अन् साखर मधुरवाणी.
ज्ञानाची आच देऊन उकळा
अहंकाराची वाफ निघून जाई,
मनाच्या गाळणीतून गाळा त्याला
षड्रिपूंचा नाश होई.
सद्भाव व प्रेमाचे दूध मिसळा
स्वच्छ व शुद्ध आयुष्याच्या चहात,
आदररूपी किटलीतून ओता
विनम्रतेच्या कपात.
सौजन्याच्या बशीतून,शांतीरूपी फुंकर घालून
घ्या आस्वाद श्रद्धेनं अन् आनंदानं,
थकवा, दुःख दूर होईल
येई मना उत्साहाचे उधाण.
