STORYMIRROR

काव्य चकोर

Inspirational

3  

काव्य चकोर

Inspirational

चैत्र आरंभ

चैत्र आरंभ

1 min
1.3K


चैत्र आरंभ...


चैत्र आरंभ जाहला

मळा सूर्याचा फुलला..

सजे पळस स्वागता

टिळा केशरी लावला..!!


प्रेम रंगात न्हाऊन

गोड ताम्हण फुलतो..

गुलमोहराचा ढंग

हृदयास अंथरतो..!!


हळदीने माखलेला

पित बहावा सजला..

श्वेत चाफ्याच्या गालाला

रंग त्याचा उमटला..!!


लक्ष वेधतो पांगेरा

लाल रंगात न्हाहतो..

कोकिळेच्या सुरातून

सारा निसर्ग डोलतो..!!


सोनझळाळीचा मोह

सूर्यकिरणांस होतो..

नववर्षाचा सोहळा

कौतुकाने न्याहाळतो..!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational