चाफा मोगरा
चाफा मोगरा
चाफा फुलला अलगद
मोगरा बागेत बहरला
झुळझुळत पवन संगीत
सुवास मनात मोहरला
उन्हाळी फुलराण्या म्हणत
आम्ही- दोघी सखी बहीणी
हर्ष जागवत ह्रदयात
नादंतो आम्ही हर अंगणी
फुलपाखरयांची मस्ती अपार
पैज लावत लपंडावात
मैत्री करत हर फुलांशी
मदमस्त होत प्रेमरसात
सुखावले मी या क्षणभर
वैरी मन झाले शांत
गंध हेरून माझे भाव
भिजवून नाहले आत
शिरकावले लक्ष्य डहाळीवर
तिची केविलवाणी नजर
कोकीळा बसली ठाव मांडुन
स्वरात दुबळे गजर
रूसतो आज क्षणक्षणात
अंग सृष्टीचे औदार्य
करतो मानव घातपात
तरी माया भरवते सौंदर्य
डॉ. ज्योती नागपुरकर
