चांगुलपणा
चांगुलपणा
आपल्या स्वभावातला
चांगुलपणा आपल्यालाच भोवतो
त्या निमित्ताने मात्र माणसाचा
खरा चेहरा दिसतो
मूळ संस्काराचे बाळकडू
अंगी असत इतक भिनलेल
कोणी कसही वागल तरी
साधेपण असत आपल्यात मुरलेल
निस्वार्थपणे मदत करण्याची
सवय काही सुटत नाही
कटू अनुभव आले
तरी चांगुलपणा काही संपत नाही
सर्वांना आपण सरळ -साधे समजतो
अनुभवानंतर कळत
आपण किती भ्रमात असतो
परिस्थितीला उत्तर
द्यायच ठाऊक असत
पण अखेरच्या श्वासापर्यंत
प्रामाणिक वागण
आपल कुठ थांबत...
