STORYMIRROR

SANJAY SALVI

Inspirational

3  

SANJAY SALVI

Inspirational

चांदण्यांनी आज तुझी ...

चांदण्यांनी आज तुझी ...

1 min
974


चांदण्यांनी आज तुझी ओंजळी भरू दे,

अन फक्त चंद्रकला आकाशी उरू दे,


लाजऱ्या प्राजक्ताचा सडा अंगणी पडू दे,

परसदारी केशरी गुलमोहर फुलू दे,


आम्रवृक्ष मोहरला कोकिळेला गाउ दे,

बांबूच्या बनामध्ये वारा शिळ घालू दे,


रानामध्ये गोपांची बासरी घुमू दे,

सांजवेळी देवळात दीपमाळ उजळू दे,


रातराणीचा सुगंध चोहीकडे पसरू दे,

आकाशी चांदण्यांचे नक्षत्र फुलू दे,

चांदण्यांनी आज तुझी ओंजळी भरू दे.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational