चाळीशीच्या उंबरठ्यावर.
चाळीशीच्या उंबरठ्यावर.
तिनेच का पाळावेत संयमाचे नियम
कधी कधी त्यालाही कळू नयेत का त्याचे स्वतःचे नियम
तिलाही वाटते आयुष्य जरा आपल्या मर्जीने जगावे
कधीतरी चार भिंतींच्या परिघातुन बाहेर निघावे
कधी तरी घ्यावा हवेत मोकळा श्वास स्वतःत सामावून
दमतच असते ना ती सारे नाते निभावून
तिलाही वाटते कोसळणाऱ्या पावसात भिजावे
दोन्ही हाताचा वलय करुन आकाश कवेत घ्यावे
हिंडावे खुशाल कुणाचीही पर्वा न करता
जगणेच सोडुन द्यावे का तिने जगाचा विचार करता करता?
नेहमी तिनेच का उभे रहावे नियमांच्या महिरपात
तिच घेत असते का सप्तपदी एकटी मंडपात
संसाराची बंधने, जबाबदारीची कोंदणे निभावून
आता कुठे होते मुक्त जबाबदारी तुन
पण तरिही जगावे लागतेच ना जगाच्या दृष्टीकोनातून
चाळीशीच्या उंबरठ्यावर वयाच्या नावाखाली
येतात तिच्यावर बंधने
पुन्हा तोच डाव, पुन्हा तिचं कोंदणे
तिलाही वाटते आपल्या डि पी ला कधीतरी असावा
आपलाच एक सुंदरसा फोटो
कधी तरी आपणही लावावे स्टेटस ला एखादे
आपले आवडते गाणे
तिही माणुसच ना मग तिच्या ही आयुष्यात
असु शकतात ना आवडी निवडी च्या
दोन बाजुचे नाणे
तुम्ही तिला नेहमीच तुमच्या नजरेने पडताळणार
एक जिवंत माणूस मन तिलाही आहे
हे कधी समजून घेणार
खळखळून हसणे आणि बिनधास्त बोलणे
आयुष्याचा भरभरून आनंद घेणे
तिलाही कधीतरी हवे असते
पण त्यातही तुम्हांला ती चुकीची कशी वाटते
वयाचे सारे बंधन तोडून तिलाही वाटते कधीतरी
वापरावे जिन्स आणि टॉप आणि कपाळी लावावी जरा
मॅचिंग टिकली
पण सर्वांच्या नजरा का जातात विस्फारून
जेव्हा गळ्यात घालते ती एखादी चैन मंगळसूत्र सोडून
तिलाच का असतात सारी बंधने जन्माला आल्यापासून
त्यालाही कधीतरी सांगावे घराण्याचा मान राख
बाहेर जरा परिवाराची इज्जत सांभाळून वाग
एक स्त्री आणि मुलगी म्हणून तिनेच का घ्यावा हा ठेका
वयानुसार सारे नियम पाळण्याचा तिच्या वरच का लादावा हेका..
