चाहूल थंडीची
चाहूल थंडीची
येता थंडीचे दिवस
होतो बदल हा नवा
ऊन कोवळे सकाळी
रात्री पडतो गारवा
जसा वाढतो गारवा
आठवते ती शेकोटी
शेक घेता शेकोटीची
हर्ष होई कोटी-कोटी
जुन्या काळाचा साधन
असे शेकोटीची शेक
थंडीमध्ये शेकोटीची
मजा घेतोय प्रत्येक
थंडी पडता गुलाबी
होते धुक्याची पहाट
पडण्याऱ्या धुक्यामुळे
बंद पडे वहिवाट
ऋतू हिवाळा सर्वांस
वाटे हा आल्हाददायी
दृश्य रम्य निसर्गाचा
मन खुलवून देयी
