बुद्ध अभिप्रेत आहे
बुद्ध अभिप्रेत आहे
राखून या जगाची लाज
सदाचार जोपासत आहे
विश्वशांतीसाठीच आज
बुद्ध पुन्हा अभिप्रेत आहे..१
उजाडतो दिवस तो रोज
बुडबुडे द्वेषाचे तरंगत आहे
समतेसह कारुण्याचीही
गरज मज अभिप्रेत आहे...२
गेले कुठे ते कालचे अस्त्र
जे भीम बुद्धांनी दिले आहे
शांतीमय क्रांती करण्यास्तव
ते शस्त्र मज अभिप्रेत आहे...३
निखा-यावर ठेवून पाऊले
माणसे माझी जळत आहे
पोळी आपली भाजणा-यांचा
अंत मज अभिप्रेत आहे...४
अन्याय किती दडपणार
इतिहास तुडवला जात आहे
जो सारनाथला अशोकस्तंभ
तोच मज अभिप्रेत आहे...५
जग आहे साक्षी याला
बुद्धाला भारत डावलतो आहे
कितीही लपंडाव केला तरी
भारतभर बुद्ध अभिप्रेत आहे...६