STORYMIRROR

SANJAY SALVI

Inspirational

3  

SANJAY SALVI

Inspirational

बरे वाटेल देवाला

बरे वाटेल देवाला

1 min
846


अरे कारे जपतोस,

अरे कारे तपतोस,

असा उपासी तापासी,

असा कसा जगतोस,


असे मारावे तनाला,

असे मारावे मनाला,

कोणी सांगितले तुला,

थोडा सावर स्वतःला,


अरे कारे झुरतोस,

कण कण मरतोस,

असा मरण्या परीस,

थोडा कस्टव तनाला,


तुझ्या हाती आहे बळ,

जेव्हा तुला हे कळेल,

तेव्हा जाईल रे वेळ,

नाही थांबणार काळ,


देवा जपण्या परीस,

थोडा जप तू स्वतःला,

कर नित्य काम धाम,

बरे वाटेल देवाला,

बरे वाटेल देवाला !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational