बोचरी थंडी
बोचरी थंडी
बोचरी थंडी अधिक बोचरी होते
शहारते अंगावर रोमरोम तरारून येते
जवळी कोणी नसता मला मुद्दाम छळते
तुझी आठवण काढून, मी तिला पळवते
बोचरी थंडी अधिक बोचरी होते
दात ओठांचा घोट घेतात, स्तनाग्रे राट होतात
पेटते मनात आग ती मांडीवर घासली जाते
तुझी आठवण तेव्हा लाव्हा शांत करते
बोचरी थंडी अधिक बोचरी होते
तोडून पाश सारे दुनियेची मी मुक्त होते
प्रहार करते घुसमटीवर माझ्या किंकाळून उठते
तुझ्या आठवांच्या पुराला अंगाची वाट देते
बोचरी थंडी अधिक बोचरी होते
जगापासून दूर माझी एकटी धावते
शर्यत माझ्यापुरतीच मग जिंकते
माझ्या परवडीला माझे सपशेल उत्तर असते

