STORYMIRROR

vishal lonari

Others

4  

vishal lonari

Others

सराव झाला आहे

सराव झाला आहे

1 min
197

तुझ्या डोळ्यात पाहण्याचा सराव मला झाला आहे

तुझ्या मनात उतरण्याचा तोच माझा मार्ग आहे


किनाऱ्यावरती शांत मी बसून असतो कधीचा

लाटांना ऐकताना तुजशी गुंजन माझे जुळले आहे

तुझ्या मनात उतरण्याचा तोच माझा मार्ग आहे


ती जी एकटीच होडी तरंगताना दिसते

जोडीस तिच्या नाव दुसरी येऊन जेव्हा मिळते

प्रवाह पोहून जाताना तुला-मला मी पाहिले आहे

तुझ्या मनात उतरण्याचा माझा हाच मार्ग आहे


तुझ्या डोळ्यात पाहण्याचा सराव मला झाला आहे

तुझ्या मनात उतरण्याचा हाच माझा मार्ग आहे


Rate this content
Log in