एक काळीज हवे आहे
एक काळीज हवे आहे
1 min
370
प्रेम तुझे भरण्यासाठी
आणि एक काळीज
मज हवे
प्रेम तुझे जपण्यासाठी
एकच काळीज न
मज पुरायचे
डोळे भरून पाहण्यासाठी
आणि एक जीवन
मज हवे
जीवाचा गुंता सुटण्यासाठी
एक आयुष्य हे
न उरायचे
साद तू मिलनाची दे
हात हा हातामधी घे
सुने सुने किती मी राहायचे
तुझवीन सख्यास सये
न राहायचे
डोळ्यात आकंठ बुडता
श्वासांची माळ गुंफूनी
ऐक काळजाचे ठोके
सारे जग जाऊ विसरूनी
प्रीतीत समाधीस्त
आता व्हायचे
उघड्या डोळ्यांनी जग बघितले
क्षण क्षण आनंदात गेले
कुशीत मातीच्या निजायचे
तुझ्याच सोबतीने
तेव्हा मिटायचे
