स्वप्न स्वप्नील पियालीचे
स्वप्न स्वप्नील पियालीचे
बघतो जेव्हा मी तुला
वाटे, बघत तुला राहावे
जन्मभरासाठी
तुझ्याचसवे सरावे आयुष्य
गीत तुझ्याचसाठी माझ्या
यावे ओठी...
ही अवतीभवती गर्दी
फुले बहरती पाखरे भिरभिरती
व्याकुळ होऊन शोधत तुझा चेहरा
माझ्या नजरा फिरती...
जमिनीवरी, आकाशावरती
बघतो जिथे जिथे
खुणा तुझ्याच सापडती
रस्ते सारे माझे मला
तुझ्याकडे ओढून नेती
सांग मला, सांग मला
समोर येऊन एकदा
मीच आहे ना तुझ्या स्वप्नांचा सोबती

