STORYMIRROR

vishal lonari

Others

3  

vishal lonari

Others

प्रेम

प्रेम

1 min
368

मला तुझी आठवण येत नाही

तू डोळ्यासमोरून हलतच नाही

तू तर डोळ्यातही मावत नाही

तुला मनातच भरून घ्यावं लागतं


प्रेमाला आपल्या उपमा नाही

प्रेमाला कुठले शब्द नाही

प्रेमाला कृतीतच आणावं लागतं

जगण्यासाठी तुझ्यावर प्रेम करावंच लागतं

तुझ्या विचारांतच मन हे हरवतं


दूर तू असलीस तरी जवळ भासतेस

इतकी तू आता मला माझी वाटतेस

क्षणोक्षणी का अशी बरे छळतेस

अल्लड भावनांनी मन माझं दाटतं


तुझ्यासाठी तुझ्यासवे जर आहे जगायचं

तुला मला मग दुनियेशीे लढायचं

एकमेकांसाठी साऱ्या जगाला विसरायचं ?

आयुष्यात फक्त एकमेकांसाठी असायचं

या विचारांनी मनाला एकटं का वाटतं


तू आयुष्यात या मावत नाहीस

तुला फक्त मनातच ठेवावं लागतं

तुला फक्त मनातच ठेवावं लागतं


Rate this content
Log in