STORYMIRROR

vishal lonari

Romance Others

3  

vishal lonari

Romance Others

गहिरे प्रेम

गहिरे प्रेम

1 min
309

त्याची आणि तिची झाली नजरानजर

त्याचे हृदय क्षणात जडले तिच्यावर

स्मिताने तिच्या त्याची पुरती वाट लागली

पाहून त्याला ती ही थोडीशी हसली, बावरली


तिला त्याच्यात मित्र तिचा दिसला

जवळचा असा सखा तिला गवसला

त्याला तिची ही प्रेमाची जवळीक वाटली

संध्याकाळी बागेत फिरताना त्याने लग्नाची मागणी घातली


तिला बसला अवचित धक्का, जीवाशी ती घाबरली

कधी नव्हे ती इतकी स्वतःवरच ती चिडत राहिली

तिचे प्रेम होते ज्याच्यावर तो हे जग सोडून गेला होता

वर्षे भरभर सरली तरी नव्हती सख्याला विसरली


जीव इतकुसा झाला त्याचा, अपराधाची भावना दाटली

त्याच्या मनातली प्रीतीची विहीर एकाएकी आटली


नव्याने प्रेम करण्याची, नव्याने संसाराची आशा त्याची

तिच्यापुढे त्याने रचल्या स्वप्नांच्या पायघड्या

जीव जडलेल्या परीला त्याने केल्या लाख विनवण्या

मन राखण्या बावरलेलं ती ही हो म्हटली


तुज सामोरी, येऊन मी धन्य झाले, हसले पुन्हा जगले

तव आयुष्यात दिलेस स्थान, मी पुन्हा मोहराया लागले

तुझे हे रे प्रेम गहिरे परी मी नाही त्यासाठी रे बनली

मज प्रेमापाठी जगसोडूनी मी परीलोकी ही चालली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance