STORYMIRROR

vishal lonari

Romance

4  

vishal lonari

Romance

प्रेमाचा पाऊस

प्रेमाचा पाऊस

1 min
1.5K

पाऊस म्हणजे तू आणि मी

पाऊस म्हणजे मी आणि तू

पाऊस म्हणजे प्रेमात पडण्याचा

प्रेम करण्याचा हक्काचा ऋतू


पाऊस म्हणजे नाही फक्त हवेतली आर्द्रता

पाऊस खरंच निसर्गाची हळवेपणाची पात्रता

पाऊस म्हणजे वाऱ्याची डोंगराला साद, ऐकलं ना तू

पाऊस म्हणजे तू आणि मी

पाऊस म्हणजे मी आणि तू


कधीकधी


पाऊस म्हणजे विरहाच्या चिखलाने अंतर्मन माखून जाणे

पाऊस म्हणजे सखीच्या आठवणीने सख्याचा जीव तुटणे

पाऊस मंद उसासे पाऊस मौनाची गुंज, जगली ना तू

पाऊस म्हणजे तू आणि मी

पाऊस म्हणजे मी आणि तू


पाऊस म्हणजे भिजरी पायवाट पाऊस म्हणजे झाडी


पाऊस सौमित्रच्या कविता जगणे, पाऊस मनाचे एक मागणे

पाऊस कधीकधी उगाच गुणगुणने आणि हसणे

पाऊस म्हणजे गंधीत मोगरा अंगणात दरवळणे...


पाऊस म्हणजे तू आणि मी

पाऊस म्हणजे मी आणि तू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance