बळजबरी
बळजबरी
अजूनही वाट पाहतोय एक बाप, मुलीच्या परतण्याची.
पाहू नाही शकणार मुद्रा, शांततेच्या खाली घुसमटणाऱ्या जिवाची.
मुठीत जिव घेऊन फिरणारा, सतत घाबरतोय.
मुलीच्या काळजीत, एक बाप तीळ तीळ मरतोय.
पोटाची खळगी विझवन्यासाठी, स्वातंत्र्याच्या नावाखाली फिरतोय.
कुठल्या क्षणी कुठल्या अंधारात, माझ्या पोरीचा जिव गुदमरतोय.
जवळचे लांबचे ओळखीचे अनोळखीचे, सगळेच लचके तोडताना पाहिलेत.
माझ्या तुटणाऱ्या काळजाला, आता फक्त हुंदके फुटायचे राहिलेत.
खर तर चूक माझी की तिची, हेच कळत नाही.
जन्म स्त्री चा तुझा, मेल्यावरही विरत नाही.
तुला खेळण्याचा फिरण्याचा जगण्याचा, सगळा अधिकार आहे.
फक्त एकटी पाहून ताकत लावण्यात, इथला पुरुष पुरूषार्थ पाहे.
मरे पर्यंत लढलीस, आता छापतील तुझ्याच खबरी.
भीती एवढीच की शास्त्रोक्त पद्धतीने, झाकून टाकतील बळजबरी.
