STORYMIRROR

sarika k Aiwale

Tragedy Others

3  

sarika k Aiwale

Tragedy Others

मरण डोळा तरळले क्षणास...

मरण डोळा तरळले क्षणास...

1 min
167

उदार मनाने घेतला तिने

एकदाचा शेवटचा श्वास 

जगले मेले त्या लाखोनी

वाहिल्या किंतुचा नि:श्वास.......


भेटता अधुऱ्या स्वप्नास 

खुणावे कुणाचा विश्वास 

काजळी भरल्या डोळ्यात 

मालवली होती एक आस.......


अशीच कितिदा भेटते ती 

नव्याने तिच्याच मरणास 

जीवनाच्या संध्यापूर्वीच 

झुरलेल्या त्या क्षितिजास......


अंतरंगी जाहली खोल दरी 

रात्र काहूरली तिच्या मनी

भान हरपलेली ती हरिणी 

घेतले समजुनी समाजास....


भयाण होत्या त्या रातिही

जीवनाच्या हिरावल्या वाटाही

वादळाचा रोख येता पाहूनही

नि:शब्द झेलले त्या तूफानास......


नजरेत तरी प्रश्न सलतोही

अंत नसता तो अनामिकेचा 

माघार घ्यावी ना जगावेही 

उत्तर द्यावे तिनेच नियतीस....


जीवन कानात कुजबुजले

मन ओठावर येऊन थांबले 

भाव खलतात अनोळखी ते 

मरण डोळा तरळले क्षणास....


उदार मनाने घेतला तिने

एकदाचा शेवटचा श्वास 

जगले मेले त्या लाखोनी

वाहिल्या किंतुचा नि:श्वास....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy