STORYMIRROR

angad darade

Tragedy

3  

angad darade

Tragedy

देवा कोपलं आभाळ

देवा कोपलं आभाळ

1 min
315

चांगला की वांगला हा 

कळनाय हेवं पावसाळा

कधी बरसल्या धारा 

तर कधी आल्या झळा 


दिवस दिवस ऊन कधी 

तर काही दिवस वांबाळ 

करपुन कधी नासुन कधी 

झाला सारा अवमेळ 


देवा कोपलं आभाळ 

आम्हांवरी कोपलं आभाळ 


करुंन दिन रात कष्ट तरी ही 

पिकांवर आली रोग राई 

उध्वस्त केली मेहनत सारी 

कळणा झालंय देवा काई 


येऊन कधी जाऊन कधी 

झाला वेळोवेळी काळ 

देवा कोपलं आभाळ 

आम्हांवरी कोपलं आभाळ 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy