ज्योत
ज्योत
वाचवा हो वाचवा मला
घेऊ नका माझा बळी..
काय माझा गुन्हा
मी तर कोवळी कळी..!
संसार-जीवनरथाचं
मी एक चाक आहे..
तुमच्या वंशदिव्याची
मीच ज्योत आहे..
बालपणापासून वृद्धत्वापर्यंत
मी अखंड-निरंतर जळते..
कुटुंबातील सकलजनांसाठी
जगते आणि मरते..
माझ्या जन्माने का कोसळे
तुम्हांवर दुःखाचा डोंगर..?
कसाई होता तुम्ही
समजता मला जनावर..!
मलाही जगू द्या
मलाही फुलू द्या..
ह्या मातीत जन्मून
आभाळ होऊ द्या..
स्वातंत्र्य, शाश्वत समतेचा
मलाही पूर्णाधिकार..
मजवीण महासत्तेचं स्वप्न
कसं होईल साकार..?