कुलज्योती..
कुलज्योती..
मुलगा वंशाचा "दिवा"
मुलगी आहे "पणती"..
मुलीच्या आगमनाने
क्रित्येक घरे उजळती..
मुलगीच सौंदर्य घराचे
करी उद्धार जगाचा..
तरी जन्मता कन्या
का हो सूर नाराजीचा..?
आजी-आजोबांची काठी
मुलगीच आधार कुळाचा..
घेई माघार प्रत्येकक्षणी
न मानता आपला-परका..
आई-बाबांची परी
आईचाच ती आरसा..
संस्कार घेऊनी चालवी
सासर-माहेरचा वारसा..
सारं काही कळूनही
दिव्यालाच झुकतं माप..
एका पणतीच्या माथी
का गौणत्वाचा अभिशाप..?
मुलगा कुलदीपक असला तरी
मुलगी असते "कुलज्योती"..
दोन्ही घराचा वंश वाढवी
म्हणूनच व्हावी लेकप्राप्ती..