अवहेलना
अवहेलना


ही सांजवेळ अबोल,
स्तब्ध सारे जग.
माझिया मनाचे,
ठप्प व्यवहार...!
ही प्रीत माझी अबोल,
बोलणार कशी ?
या सांजवेळेची,
सजा सोसणार कशी?
तो गुलमोहर वळणावरचा,
आता आहे धास्तावला.
तुझ्या माझ्या प्रीतीचा,
जो साक्षीदार होता...!
फक्त एकदा तू बोल,
तुझ्या हृदयाचे बोल.
प्रीतीची अवहेलना,
नाही सोसवत आता...!