शाप
शाप
त्या नभाने या धरेला ,
दान द्यावे...!
विरहाच्या अश्रूंनी तिला,
स्नान द्यावे...!
सोसूनी सारा रितेपणा,
वरदान द्यावे...!
सौख्य नांदावे म्हणून,
वाण द्यावे...!
या धरेने त्या नभाला ,
मान द्यावा...!
सोसल्या विरहाचा जणू,
संदेश द्यावा...!
सौभाग्याचे लेणे लेऊन,
मिरवीत जावे...!
विरहाच्या जखमांवर ,
सुखाचा लेप द्यावा...!
त्या नभाचे या धरेवर,
प्रेम सारे...!
या धरेचे त्या नभावर ,
प्रेम सारे...!
जाणुनी मनाने एकमेका,
मान द्यावा...!
सुखाने रहा म्हणून,
परस्परांस ....शाप द्यावा!

