STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Tragedy

3  

sarika k Aiwale

Romance Tragedy

गुंतले हे मन तुझ्यात

गुंतले हे मन तुझ्यात

1 min
232

प्रेमात सखे 

सांगू मी कसे

गुंतले मन 

तुझ्यात असे 


क्षण कोमल 

मन चंचल 

भारवते हे 

कळे ना सल


सखे प्रेमात 

सल उरात 

याद छळते 

दोन्ही मनात 


हा विरहाचा

क्षण दू:खाचा 

भावतो तरी

भाव सुखाचा 


आभास होता 

तू ही नव्हता 

उरला मनी 

तो श्वास खोटा 


जग सोडून 

नाते जोडून 

शिकले होते 

तुज कडून 


ओली पापणी 

कोरड्या मनी

जगते  तेच 

श्वास अजुनी 


कळी खुलली 

भरली 

स्वप्ने तीची ती 

कोणी तोडली


सखे प्रेमात 

तुझ्या मनात 

दे जागा थोडी 

तु हृदयात 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance