जखम
जखम
आज पहाटे तू
स्वप्नात येऊन गेलास,
ठेवणीतल्या जखमा
चिघळून गेलास.
तसा तू मला
जीव लावणारा,
ओरखडलं नुसतं तरी
फुंकर घालणारा.
मात्र जिव्हारी घाव
घालून गेलास.
मी समोर असताना;
तु बेभान होऊन बरसायचा.
कधी प्रेम होऊन,
कधी शब्द होऊन,
तर कधी स्पर्श होऊन,
आता मात्र प्रेम
शब्द, स्पर्श हे
सारं विरून गेलं,
माझ्या नयनांचं बरसण
मात्र कायम राहील.
तशी मी आता
स्थिरावले होते,
माझ्या सुखी संसारात
अखंड बुडाले होते.
तु मात्र अचानक
पहाटे स्वप्नात येऊन गेलास.
जुन्या जखमांची खपली काढून,
पुन्हा एकदा जखम
माझी ताजी करून गेलास....