वाद नकोत म्हणून
वाद नकोत म्हणून
त्याच्या प्रत्येक बोलण्याला
उत्तर असते तिच्याकडे
पण वाद नकोत म्हणून ती
नेहमी चुप बसते.......
चुप बसुन...
आतल्या आत गुदमरते ती......
कोंड़तो तिचा श्वास.....
करते तिचेच अस्तित्व
तिला प्रश्न.........
कुणासाठी?........
कशासाठी?........
कधीपर्यंत?.........
की आजन्म?..........
हे तोंडावर बोट........
हे भावना गिळत जगणे
हे डोळ्यातले पाणी
डोळ्यात सुकवून
शुष्क जगणे......
आणि वर स्वत:च्या
स्वप्नांना मारून त्याच्या
शव यात्रेत फूले टाकून
परत परतीची तिच
वाट धरणे.......
पुन्हा त्याच
वादळांच्या स्वाधीन
स्वतःला करणे......
हे सारे केवळ
वाद नकोत म्हणून......
