बळीराजा (शेतकरी)
बळीराजा (शेतकरी)
🌿🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿
बळीराजा शेतकरी माझा
सगळ्या जगाचा तो पोशिंदा !
कष्ट करतो दिवस न् रात्र...
थंडी-वारा, पावसाची नाही करीत फिकीर कधी...!
पण एवढं करूनही त्याला मिळतं काय?
ओला, सुका दुष्काळ पडल्यावर,
त्याच्या हातात मात्र उरतं तरी काय?
एकटं सोडून लेकरांना...
घेतो कारभारीण साथीला..
जातो भल्या पहाटे शेतावर..!
पाणी करतो रक्ताचं....
सर्जाराजाच्या संगतीने....!
राबतो शिवारात पावसात ओल्या,
म्हणूनच मिळतात सुखाचे दोन घास...!
शिंपून मोती घामाचे,
सोनं पिकवतो शेतात..!
स्वतः मात्र कधीतरी,
उपाशीपोटीच झोपतो..!
राबून शेतात पिकवतो धान्य
पण, बाजारात मात्र पिकाला,
मिळतो कवडीमोल दर...
पिकासाठी काढतो ऋण सावकारी..
अडकून गर्तेत कर्जाच्या,
आवळतो गळ्याभोवती फास करकचून....!
कधी संपणार बळीराजाची शोकांतिका...
दुःख, दैन्य आणि व्यथित जीवन..!
चला तर करु या साऱ्यांनी,
त्याच्या कष्टाची कदर...
त्याने पिकवलेल्या मालाला,
देवू या हमीभावाचा योग्य दर...!
जगाचा पोशिंदा जर राहिला समाधानी,
तरच होईल काळी धरणी आनंदी...!
🌿🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿
