STORYMIRROR

Pavan Pawar

Abstract Tragedy Inspirational

4  

Pavan Pawar

Abstract Tragedy Inspirational

बळीराज

बळीराज

1 min
268

पाऊस आणि भिजून टाकले त्या मातीला नवजीवनाकरिता,

उधळला विकासाचा गंध बळी राज्याच्या सामर्थ्याकरिता.

निष्ठूर झालेल्या जमिनीला, ममता आज आली,

शेतकऱ्याच्या उद्धाराची वेळ बघा कशी झाली.


जगाला पोसणारा पोशिंदा आज स्वप्न बघतो नवजीवनाचे,

परीपक्व उत्पन्न जन्माला घालतो फक्त एका बिजाचे.

पिवळ्या नवरीने आज हिरवा शालू ओढला,

शेतकऱ्याच्या संसाराला तिचा हातभार लागला.


आयुष्याला मार्गी लावण्यास एक योद्धा आता सज्ज होणार,

नापीक जमिनीतील दगडाला देखील आता पाझर फुटणार.

अंगावर आलेला घाम त्याच्या श्रमाची किंमत सांगतो,

पण कसे रे तुझे शिक्षण व्यापारातच तुला घात मिळतो.


जगाला जगविण्याच्या धुंदीत तुझे अस्तित्व खचले,

नांगराच्या दांड्याला स्पर्श न करणारे तुझे अवलाद बनले.

साला म्हणून तुला तुझ्याच धरणात मुतायला तयार झाले,

कसे रे तुझे नेतृत्व ज्यांनी तुझेच आयुष्य बिघडवले.


आश्वासनाच्या भ्रमावर तुझे बोट कुठेही जाते,

त्रास किती होतो जेव्हा तुझी मान फासावर राहते.

मूर्ख आहेस तू गजपुत तुला ठामपणे सांगतो,

तुझ्याच नावावर बघ तुझा स्वत्व जगतो.


विश्वास नाही केला तू कधी जीवनाच्या फक्त सत्यावर,

तुझ्यात बालिशपणामुळे यावं लागते नेहमी तुला रस्त्यावर.

प्रार्थना करतो विठ्ठलाला तुझी वीट तू सोडून दे,

फक्त एकदा या देशात बळीराजाचं राज्य येऊ दे.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract