STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

4  

Shila Ambhure

Inspirational

बलिदान

बलिदान

1 min
252

सुपुत्र आम्ही भारतमातेचे

शत्रूची आम्हा जरा न भीती.

पोलादी रुंद छाती अमुची

वार झेलण्या सदैव सज्ज ती.


करू नका नजर वाकडी

मान मोडूनि देऊ हो हाती

माय अमुची भारतमाता

नाही कुठली दूसरी नाती.


खडा पहारा अमुचा भारी

घेत नाही क्षणाची विश्रांती.

हाणून पाडीतो भ्याड हल्ले

नांदण्या देशात सुख शांती. 


नको आम्हाला पुरस्कार तो

न लागे कोणताही सन्मान.

देहावरी झाकता तिरंगा

वाटे आम्हा मोठा अभिमान.


तिरंगी झेंडा प्राण अमुचा

तयासाठी देऊ बलिदान.

जन्म घेऊ इथेच नव्याने

मायभू दे आम्हा वरदान.


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Inspirational