STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

बलिदान शहिदांचे

बलिदान शहिदांचे

1 min
875



शिकार जरी झालो आम्ही किती ही भ्याड हल्ल्यांचे

आमच्या रक्तातून स्फुर्ती घेतील लाखो नागरिक भारताचे


दुष्मनांचे मुडदे पाडल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही

अखंड भारत तोडण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही


छुपे युद्ध, आतंकवाद हे भ्याड आहे आतंकवाद्यानों

तुमच्या काळ्या कृत्याचे दिवस आता संपणार क्रूरकर्म्यानों


किती ही आमचे बलिदान झाले तरी ही हटणार नाही

तुमचा खात्मा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही


कमजोर नका समजू आम्हांला क्षणात संपवून टाकू

शस्र आमची सज्ज आहे ,वतन तुमचे कायमचे संपवू


साऱ्या जगाला ठाऊक आहे ताकत भारत देशाची

पेटून उठलो आता आम्ही, सुपुत्र भारत मातेची


शहिदांचे बलिदान व्यर्थ कधीच जाणार नाही

त्यांच्या माय बापाना न्याय दिल्याशिवाय गप्प राहणार नाही


प्रत्येक भारतीयाचे रक्त बदला घेण्यासाठी सळसळते आहे

दुष्मनांना संपविण्यासाठी देश आता राष्ट्रीय भावनेने एक झाला आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational