बखाड(उघडीप)
बखाड(उघडीप)
काय देवा तू,असं कसं केलं
घंटेतीलं नाद,चोरुनचं नेलं।।धृ।।
वासरु हंबरे,गावभर फिरे
इथ तिथं करे,मागे पुढे झुरे।।
पिक राजा शेंडे,लावती ते झेंडे
उगी मुगी धांडे,नको ते बखाडे।।
वृक्षवल्ली खरे,आमुचे सोयरे
भरजरी तुरे, हिरवले खरे।।
नदी नाले सुखे,तलाव ही सुखे
कसे राहू सुखे,जोडी हात दु:खे।।
चिल्ले बिल्ले खोपे,झरण्याची साठे
नदीस न बापे,सापडेना कुठे।।
कावरी होळपे,बावरी तळपे,
हरीण ती कळपे,झाली दंगा धोपे।।
कृष्ण वनी देवा, गुरं ढोरं यावां
सुटुर बुटुर ,काही माही खावां।।
उघड्या डोळ्याने,पहावते देवा
उघड बखाड,पाणी पाड देवा।।