बीरसा मुंडा
बीरसा मुंडा
आदिवासी जननायक बीरसा मुंडा
१५ नोव्हेंबर १८७५ रोजी जन्मला
याच लढवय्याने न्याय व हक्कासाठी
स्वातंत्र्यलढ्यात मोठा लढा उभारीला....
वडील होते त्यांचे शेतमजूर
घरची गरिबी होती फार
इंग्लीश स्कूलमध्ये झाले शिक्षण
आधुनिक विचारांचा होता प्रहार...
भारतीय संस्कृतीचा होता अभिमान
केला एकेश्वरवादाचा पुरस्कार
वनाचा केला कायदा ब्रिटिशांनी
यामुळे आदिवासी झाले बेघर....
ब्रिटिशांविरूध्द केले जनआंदोलन
आणि अनेक लढाया केल्या
दोन वर्षाचा झाला कारावास
ब्रिटिशांविरूध्द केल्या लढाया...
आणले जेरिस ब्रिटिशांना
शस्त्र वापरली पारंपारिक
होती बिकट अवस्था आदिवासींची
सामाजिक व आर्थिक....
केले अपार प्रयत्न बिरसा मुंडानी
केले आदिवासींना संघटित
पाहुन शौर्य बिरसाचे
लोक सारे झाले अचंबित....
मध्यप्रदेशातील आदिवासी
आजही मानती देवासमान
शिक्षण,स्वच्छता आणि अंधश्रद्धा
यावर केले बिरसांनी समाजप्रबोधन...
