STORYMIRROR

Ganesh G. Shivlad

Classics Inspirational

3.5  

Ganesh G. Shivlad

Classics Inspirational

।। भूपाळी आरती श्री गणेशाची ।।

।। भूपाळी आरती श्री गणेशाची ।।

1 min
374


होई जागृत श्री गणराया। 

हेरंबा... मंगल मूर्ती मोरया।

वरद विनायका गौरी तनया। 

श्री शिवसुता संकट नाशी।।धृ।।


वक्रतुंड तू एकदंत तू। 

वरद विनायक, लंबोदर तू।

गजमुख तू भालचंद्र तू। 

सिद्धिविनायक तूच असशी।।१।।


गजानना तू मनांचा राजा। 

निवारशी तू सकल भय काजा।

सकल चराचर शरण तुजला। 

गणनायका तूच मिरविशी।।२।।


<

/strong>

पितांबर झळके अंगी सुंदर। 

वाहन साजे तुज उंदीर।

गळा कंठीमाळा पायी घुंगरू। 

मोदक तुजला नैवैद्याशी।।३।।


जगकल्याणा तू अवतरशी। 

मोह मायेला तू हरविशी।

रिद्धी-सिद्धीचा रे विधाता। 

शरणार्थीला हृदयी धरिशी।।४।।


भक्तांचा रे तू चिंतामणी। 

तव मंगल रूप वसे ध्यानी।

करू गुणगान निशिदिनी। 

लीन हा गणेश श्री चरणी।।५।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics