STORYMIRROR

Manisha Awekar

Inspirational

3  

Manisha Awekar

Inspirational

बहुरंगी जीवन

बहुरंगी जीवन

1 min
255

काव्यप्रकार अष्टाक्षरी


जीवनाचे वरदान

देई ईश्वर मानवा

पूर्व प्राक्तनानुसारे

सुख-दुःखांच्या जाणीवा  (1)


जीवनात आस कोणा

विश्वशांती मिळण्याची

सुख-दुःख गमे त्यासी

नित्य समसमानची    (2)


यज्ञवेदी जीवनाची

ध्येयनिष्ठ बनविती

सुख आशा नि अपेक्षा

सहजचि अर्पियती    (3)


दान पाठपूजेपेक्षा

श्रेष्ठ मानवताधर्म

पुण्याईच्या भारे झोळी

वाहे भरुनी सत्कर्म    (4)


जीवनाचा रंगमंच

सदा फिरताचि असे

अज्ञातचि मानवासी

क्षण अखेरचा असे    (5)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational