STORYMIRROR

Savita Kale

Tragedy Others

4  

Savita Kale

Tragedy Others

भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

1 min
434

विळखा घालून साप बैसला जसा

देश भ्रष्टाचाराच्या तावडीत घावला असा

ना दंश करी, ना जीवे मारी

श्वास कोंडुनी घुसमट होते जिव्हारी ।। १।।


क्षेत्र शिल्लक न राहिले कुठे

जेथे पाऊल याचे न पडले

लाच दिली या भ्रष्टांना की,

मनासारखे सारे घडले ।। २।।


शाळेत प्रवेश असो, की बँकेचे लोन

स्मशान असो, वा इलेक्शन

मोठा 'आ' करून बसलाय दारात

विकृतपणे हासतोय, जोरजोरात ।। ३।।


भ्रष्टाचाराचे धनवान पुजारी

भीक मागती होऊन भिखारी

कधी प्रेमाने, तर कधी बळजबरी

लाच घेती ते नाना प्रकारी ।। ४।।


भ्रष्टाचाराची कीड अशी

देशाला अंतर्बाह्य पोखरतेय

संसर्गजन्य रोगाहून गतीने

सर्वत्र रोगराई पसरवतेय ।। ५।।


इमान आपला ,संपत्ती खरी ही

ठेवा तिला जरा जपून

विचार केला प्रत्येकाने असा

तर भ्रष्टाचार जाईल संपून।। ६।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy