STORYMIRROR

Prashant Kadam

Inspirational

5.0  

Prashant Kadam

Inspirational

बहर

बहर

1 min
1.1K



बहर !


तीच फुले बहरली आज

मोगरा केवढा तो दरवळे

ये प्रिये तू तशीच जवळ

प्रित फुले तुझ्या मुळे


मंद वारा झुलतो तसाच

आसमंत मस्त बहरला

कोमल तनू किरणांनी

प्रात: काल प्रकाशला


तेच सर्व असुनी आज

मुग्धता आज ती कुठे

किरणे तिच, बहर ही तोच

प्रसन्नता आज ती कुठे


त्या कोमल प्रेमाच्या

स्मृती स्वप्नी पाहतो

तळपत्या उन्हात उगा

मी चंद्र तारे शोधतो


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Inspirational