STORYMIRROR

Pandit Warade

Classics

2.5  

Pandit Warade

Classics

भक्तीगीत

भक्तीगीत

1 min
14K


जटाभार डोई गळा सर्पमाला

नमस्कार माझा तया शंकराला।।धृ।।


सांगे शीतलता चंद्रकोर भाळी

नयन तिसरा शोभतो कपाळी

चिताभस्म लेप लावूनी अंगाला।।१।।


समुद्र मंथनी जहर निघाले

जनहितासाठी हलाहल प्यायले

नीलकंठ नाम शोभते जयाला।।२।।


त्रिशूल डमरू व्याघ्राम्बर कटी

बसायाशी नंदी शोभे उमापती

क्रोध येता करी तांडव नृत्याला।।३।।


वसे प्रेमगंगा ज्याच्या हृदयात

वास्तव्य त्याचे सदा स्मशानात

शेवटचे सत्य सांगतो जगाला।।४।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics