भक्त पुंडलिक
भक्त पुंडलिक
वेष शुभ्र वारकरी
माथी चंदनतिलक
टाळ, चिपळ्या नी वीणा
गाई माऊली कौतुक॥१॥
उभा राही पुंडलिक
सुरू करी कीर्तनास
स्वये विठ्ठल नाचतो
वाटे कौतुक जनांस ॥२॥
हरी भेटीचा सोहळा
काय वर्णावा पामरे
आनंदाचे डोही न्हाती
नेत्री आसवं पाझरे ॥३॥
तेजोमय पांडुरंग
मूर्ती दिसते सावळी
भक्ताचिया दृष्टीतून
पहा तुम्ही हो माऊली ॥४॥
पंढरीस आहे उभा
विटेवरी पांडुरंग
कर ठेवुनिया कटी
भक्त मिलनात दंग॥५॥
दास विठ्ठल म्हणुनी
घेई समाधी मंदिरी
संत पद-रज लाभो
होती भावना अंतरी॥६॥
