भेट अखेरची
भेट अखेरची
भेट तुझी माझी राजा
कशी सांग रे विसरु?
मन झाले सैरभैर
कसे तयाला आवरु?
अशी कशी माझ्या हाती
देऊ केलीस पत्रिका?
कोसळली प्रीतवेल
प्रतारणा अशी रे का?
मनी प्रश्न अगणित
गोठल्याच संवेदना
मुग्ध ढळत्या प्रीतीला
उमजेना ही वंचना
अश्रू नयनी गोठले
नाते प्रेमाचे नुरले
रंग प्रीतीचे रुसले
दिन सोनेरी सरले
मूक निरोप घेऊनी
वाट पुढची चालते
उरी आठव भेटीचा
जन्मभरी मी जपते
