STORYMIRROR

Rajan Jadhav

Inspirational

3  

Rajan Jadhav

Inspirational

भावपूर्ण श्रद्धांजली

भावपूर्ण श्रद्धांजली

1 min
300

चिमुकल्या पाऊलांनी , धरणीवर चालताना 

माझा तू होतास , धरला हातात हात ।। 

हिराविले पितृछत्र , नियतीने माझे

दृश्य ईश्वर बनूनि , तूच दिली होतीस साथ ।।१।। 


शाळा मला , नेहमीच वाटे अप्रिय 

चुकविण्या तिला , मझजवळ युक्त्यांची यादी ।। 

माझे बहाणे , खरे खोटे उमजून तू

पायावर छडी , लालेलाल उगळली आधी ।।२।। 


पडलो जरी दगड धोंड्यावर , रडत मी उथाणा 

हसविण्या मला , त्यावरही तू मारली लाथ ।। 

वाढविण्या मनगटातले , बळ माझ्या 

अपयशांवर करण्या , शिकवीली तू मात ।।३।। 


विद्येसवे कला कौशल्ये विकसित तु केलीस

शिकविल्या मला , बनविण्या गणेश मूर्ती ।। 

चित्रकला रंग-रांगोळी , बनविले माझे सोबती 

भटकण्यापूर्वी कुठेही मी , दिलीस तू यातूनि स्फूर्ती ।।४।। 


शिकवण तुझी , एकटा असता आपण या जगी 

न डगमगता करावे , स्वतः चे नेतृत्व ।। 

विसंबूनि न राहता , कुणावरही 

सिद्ध करून दाखवावे , हिम्मतीने स्वकर्तृत्त्व ।।५।। 


आयत्या पिठावर रेघोट्या , पसंत नव्हत्या तुला मुळी

न थकता करावे कष्ट , लढवावी बुद्धी अन् छक्कल ।। 

न घाबरता स्वाभिमानाने , ठेचावे दुराभिमानाला 

निंदकानेही चोरुन करावी , जशी आपलीच नक्कल ।।६।। 


नाही कमविला , जमिन जुमला आणि पैसा 

चारित्र्यसंपन्नता हीच तुझी अमूल्य जमा ।। 

आजच्या विश्व- पितृदीनानिम्मित 

भावपूर्ण श्रद्धांजली , तुला मामा ।।७।। 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational