भावनांचं ओझं
भावनांचं ओझं
ओठावर हसू
डोळ्यात आसू
हृदयातल्या दाटत्या
भावनांचं ओझं कुठे
कधी कसं उतरवू
ओठावरचं हसणं
माझा आनंद नाही, पण
असं चार लोकात जगणं
याशिवाय आता काही पर्याय नाही
त्याचं आपलं छान आहे
तो मस्तमौजी त्याच्याच
आनंदात असतो ,
मला हे असे चालत्या
अर्ध्या वाटेवर एकटे सोडून
माझ्या वेदनेवर हसतो
मीही म्हटले हसतोस तर हस
जिवाला लागेल तुझ्याही
चातक आस एक दिवस
घश्याची तहान भागेल खरं ,
मात्र मनाला कोरड पडेल एक दिवस.
