भावना
भावना
पापणीला सोसवेना
भास सुखी स्वप्नांचा,
भार अंतःकरणाला
जणू डाव हा पत्त्यांचा!
ओलावल्या अश्रुलाही
मार्ग ना तो मिळेनासा,
डोळ्यांनीच गिळलेला
थेंब झाला दिसेनासा!
खोटा चेहरा तुझा तो
हसे गं चारचौघांत,
आत मन तुझे वेडे
अडकले कचाट्यात!
जाणलेल्या अजाण त्या
तुझ्या सखे भावनांना
वाट दे गं मोकळी तू
वाहू दे ना मुक्त त्यांना!