Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Trupti Naware

Inspirational

4  

Trupti Naware

Inspirational

भावना

भावना

1 min
13.3K


व्यक्त करता न येणाऱ्या भावना

खूप बोलक्या असतात ..

व्यक्त होण्याच्या प्रयत्नात ,खुप काही बरळतात..

कधी धडपडतात..जमीनीवर आदळतात...

धक्का -बुक्कीच्या आंदोलनात..परत

माफीही मागतात

अपराध नसतो त्यांचा

त्यांना सवय नसते दिखाव्याची

पण प्रयत्न सोडत नाहीत

आशा असते ...आशेला मिळवायची..

अबोध मनास स्पर्श करतात

निरपेक्षता असते आपलेपणाची

व्यक्त करता न येणाऱ्या भावना

खुप प्रेमळ असतात ...

जणू काही त्यांच्यात असते

विहीर तुडुंब प्रेमाची

घाई करते ओसंडण्याची

उत्सुकता बाहेर डोकावण्याची

तरी ठेचा तिलाच लागतात

पण क्षमता असते सोसण्याची

तिची नजर शोधत असते

शोधणारी नजर...

तिला फक्त ओळखायचे

तत्पर होते हजर

व्यक्त करता न येणाऱ्या भावना

खुप प्रामाणिक असतात

स्वतः च स्वतःला तुरुंगात डांबुन

स्वातंत्र्याच्या वाटेत असतात

वाटेत स्वप्न, इच्छा, आकांक्षा

ह्या मैञीणीही भेटतात

पण स्वतःवरचा गाढ विश्वास

स्वतः च्याच प्रेमात पडतात

प्रयत्नांच्या पराकाष्टेत

हळुहळू व्यक्त होतात

पण जशी फुंकर जखमेवरची

हलकासा दिलासा देते

हा क्षण सुवर्णपरीसाचा

दगडासही सोनं करतो

अव्यक्त भावनेत

असचं काहीतरी

तिच्या वाटेत

प्रत्येकजण...चातक बनतो !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational